किती गोंडस! दीपिका पाठोपाठ 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने ७ महिन्यांनी दाखवला लेकीचा चेहरा
By कोमल खांबे | Updated: October 22, 2025 14:42 IST2025-10-22T14:42:05+5:302025-10-22T14:42:33+5:30
दीपिकापाठोपाठ एका मराठी अभिनेत्रीनेही तिच्या गोंडस मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिने तिच्या ७ महिन्यांच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत.

किती गोंडस! दीपिका पाठोपाठ 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने ७ महिन्यांनी दाखवला लेकीचा चेहरा
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने लक्ष्मीपूजनच्या मुहुर्तावर पहिल्यांदाच लेक दुआचा चेहरा चाहत्यांना दाखवला. दीपिका आणि रणवीर सिंगने दुआसोबतचे काही फोटो शेअर केले. दीपिकापाठोपाठ एका मराठी अभिनेत्रीनेही तिच्या गोंडस मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिने तिच्या ७ महिन्यांच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत.
मोनिकाने मार्च महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. लग्नानंतर १० वर्षांनी आई झाल्याने मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मोनिकाला १५ मार्च रोजी कन्यारत्नाची प्राप्ती झाली. लाडक्या लेकीचं नाव तिने वृंदा असं ठेवलं आहे. आता मोनिकाने तिच्या गोंडस लेकीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
ठरलं तर मग मालिकेत मोनिका अस्मिता हे पात्र साकारत आहे. मोनिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. प्रेग्नंसीमध्येही ती चाहत्यांना अपडेट्स देत होती. त्यासोबतच अनेक टिप्सही तिने शेअर केल्या होत्या. आताही मोनिका डेली व्लॉग बनवून तिच्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करत असते.