फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:58 IST2026-04-01T17:17:43+5:302026-04-01T18:58:32+5:30
जिथे बड्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत, तिथे एका ६३ वर्षांच्या अभिनेत्रीने चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे.

फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?
Radikaa Sarathkumar Thaai Kizhavi : चांगली कथा आणि दमदार अभिनय असेल, तर मोठ्या स्टारशिवायही चित्रपट सुपरहिट होऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार (Raadhika Sarathkumar) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला तमिळ विनोदी-नाट्यपट 'थाई किझावी' (Thai Kizhavi) सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात कोणताही मोठी स्टारकास्ट नसतानाही, राधिका यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ८० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून एक नवा इतिहास रचला आहे.
Sacnilk च्या माहितीनुसार, फक्त ९ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ८० कोटींहून अधिक रुपयांची एकूण कमाई (Gross) केली आहे. राधिका सरथकुमार यांनी सांगितले की, जर या चित्रपटाचे तिकीट दर मोठ्या चित्रपटांसारखे १ हजार ते १ हजार ५०० रुपये असते, तर हा चित्रपट सहज १०० कोटींचा टप्पा पार करू शकला असता. मात्र, तिकीट दर सुमारे १५० रुपये असल्यामुळे प्रेक्षकांवर कोणताही आर्थिक ताण आला नाही. हा चित्रपट शिवकुमार मुरुगेसन यांनी दिग्दर्शित केला असून शिवकार्तिकेयन यांच्यासह निर्मिती करण्यात आली आहे.