पुण्याच्या रस्त्यांवर वडापाव खाताना दिसला 'हा' सुपरस्टार अभिनेता; चव घेताच म्हणाला- "उत्कृष्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:58 IST2025-12-01T15:55:12+5:302025-12-01T15:58:44+5:30
पुण्यात स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसला हा सुपरस्टार. लोकांच्या गर्दीत जाऊन खाल्ला वडापाव. व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या रस्त्यांवर वडापाव खाताना दिसला 'हा' सुपरस्टार अभिनेता; चव घेताच म्हणाला- "उत्कृष्ट..."
अस्सल खवय्यांसाठी पुणे हे प्रसिद्ध शहर. पुण्यातील वडापाव, मिसळ, बर्गर आणि इतर अनेक पदार्थ चाहत्यांच्या हमखास आवडीचे असतात. हे पदार्थ खाण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक पुणे शहरात हजेरी लावत असतात. अशातच पुण्यातील रस्त्यांवर वडापाववर ताव मारताना भारतीय सिनेसृष्टीतला एक सुपरस्टार दिसला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला.
सध्या 'तेरे इश्क में' चित्रपटाची खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता धनुष आणि क्रिती सेनन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत हे तिघेही नुकतेच पुणे शहरात दाखल झाले आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच येथील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा मनमुराद आस्वाद घेतला.
धनुषने मारला वडापाववर ताव
साउथचा सुपरस्टार धनुष आणि क्रिती सेनन यांची पुण्यातील फॅन्सची भेट घेऊन तेथील खाद्यपदार्थांवर मनमुराद ताव मारला. धनुषने त्याच्या स्टोरीवर दोन व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये, तो आणि दिग्दर्शक आनंद एल. राय गाडीत बसून वडापाव खाताना दिसत आहेत.
क्रिती सेननने दोघांना विचारले, "चांगला आहे का?" यावर धनुष म्हणाला, "उत्कृष्ट, अविश्वसनीय!" तर आनंद एल. राय यांनीही त्याला दुजोरा देत, "चांगला आहे" असे सांगितले. क्रितीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "पुण्यात आलात तर खा आणि जेवणाच्या प्रेमात पडा!"
Dhanush relishing vada pav in Pune: “Unnnnbeleavable!” he says. 😍#Dhanush#TereIshkMein#keerthisonenpic.twitter.com/ZFU3vY8doq
— justsomenoise (@justsomenoises) November 30, 2025
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, आनंद एल. राय दिग्दर्शित आणि निर्मित 'तेरे इश्क में' हा एक म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. धनुषने यात 'शंकर' आणि क्रिती सेननने 'मुक्ती'चे पात्र साकारले आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने पहिल्या तीन दिवसांमध्ये चांगली कमाई केली असून धनुषच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.