"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:10 IST2025-10-08T10:10:05+5:302025-10-08T10:10:29+5:30
चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि सेलिब्रिटी असलेली त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेऊन वेगळे झाले खरे पण अजूनही ते एकमेकांवर आरोप करत आहे. धनश्रीने 'राइज अँड फॉल' या रिएलिटी शोमध्ये चहलसोबतच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला होता. चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना युजवेंद्रने धनश्रीच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. "मी एक खेळाडू आहे आणि मी चीट केलेलं नाही. जर मी दोन महिन्यांतच चीट केलं असतं तर इतके वर्ष आमचं रिलेशनशिप चाललं असतं का? माझ्यासाठी हा चॅप्टर संपलेला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही जावं. जर दोन महिन्यांतच चीट केलं गेलं असतं तर त्या रिलेशनशिपमध्ये कोणी राहिलं असतं का? मी माझ्या भूतकाळातून पुढे आलो आहे. पण, काही लोक अजूनही तिथेच अडकले आहेत. अजूनही त्याच गोष्टी धरून बसले आहेत. अजूनही त्यांचं घर माझ्या नावामुळेच चालतं. त्यामुळे ते हे सुरूच ठेवतील. मला याने काहीच फरक पडत नाही", असं युजवेंद्र चहल म्हणाला.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर मार्च २०२५ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. धनश्री आणि युजवेंद्र हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल होते. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.