Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:31 IST2025-11-18T14:30:05+5:302025-11-18T14:31:05+5:30
Armaan Malik : करोडपती युट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी फेम अरमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
करोडपती युट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी फेम अरमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्याने पंजाब पोलिसांकडे संरक्षण मागितलं आहे. अरमानने इन्स्टाग्रामवर खुलासा केला की, त्याला आणि त्याच्या मुलांना गेल्या महिन्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आणि पंजाब पोलिसांना कारवाई करण्याचं आवाहन केलं. व्हिडिओमध्ये अरमानने पुरावा म्हणून एक ऑडिओ क्लिप देखील सादर केली.
अरमान म्हणाला, "मला आता जी धमकी मिळाली ती ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल." त्याने स्पष्ट केलं की तो गेल्या महिन्यापासून या त्रासाला तोंड देत आहे. त्याने पुढे म्हटलं की केवळ त्यालाच नाही तर त्याच्या मुलांनाही धमक्या दिल्या जात आहेत. पंजाब सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत अरमानने धमकी देणाऱ्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप देखील पोस्ट केली. "तुझ्या मुलांना वाचव. आधी तुझ्या मुलांना गोळ्या घातल्या जातील आणि नंतर तुला गोळ्या लागतील."
युट्यूबरने सांगितलं की, गुन्हेगारांनी सुरुवातीला त्याच्याकडे ५ कोटी रुपये मागितले होते. मग त्यांनी ३० लाख रुपये मागितले. आता ते १ कोटी रुपये मागत आहेत. अरमान मलिकची सोशल मीडिया पोस्ट पाहून त्याचे चाहते खूप अस्वस्थ झाले आहेत. एका युजरने "आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू" असं म्हटलं. तर दुसऱ्याने "आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. काही दिवस बाहेर जाऊ नका आणि सुरक्षित राहा" असा सल्ला दिला.
अरमान मलिकचं दोनदा लग्न झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायल आहे आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक आहे. अरमानला चार मुलं आहेत. पायल आणि अरमानला अयान, तुबा आणि चिरायू अशी तीन मुलं आहेत. अरमान आणि कृतिकाला झैद नावाचा एक मुलगा आहे. अरमान बिग बॉस ओटीटी सीझन ३ मध्ये त्याच्या दोन्ही पत्नींसोबत दिसला होता.