"बनवलेली इमेज मातीत मिळवलीस..", रितेश भाऊने घेतली अरबाजची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:00 IST2024-09-07T15:59:38+5:302024-09-07T16:00:10+5:30
Bigg Boss Marathi Season 5: आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून देत असतो. या आठवड्यात त्याने निक्कीसह अरबाजचादेखील चांगलाच क्लास घेतला आहे.

"बनवलेली इमेज मातीत मिळवलीस..", रितेश भाऊने घेतली अरबाजची शाळा
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सीझनमधील स्पर्धक सातत्याने चर्चेत येत असतात. प्रेक्षक दररोज एपिसोडची उत्सुकतेने वाट पाहत असतात. त्याप्रमाणे भाऊच्या धक्क्याचीही प्रतीक्षा करत असतात. रितेश भाऊ कोणाची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून देत असतो. या आठवड्यात त्याने निक्कीसह अरबाजचादेखील चांगलाच क्लास घेतला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घराची क्वीन निक्की स्वत:ला मानते. तर या क्वीनच्या चुका कव्हर करणारा अरबाज पटेल आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ घरातील सदस्यांना अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायपुढे येत होता का? असा प्रश्न विचारताना दिसणार आहे. अरबाजने गेला आठवडाभर धिंगाणा घातला होता. निक्कीला दूर ठेवा, मला त्रास होतोय असं म्हणत सर्व घराचं लक्ष त्याने स्वत:कडे ओढून घेतलं होतं. त्याचा त्रास पाहून घरातील सर्व सदस्यांनी त्याची मदत केली. त्याच्याबाजूने भांडले. पण भाऊचा धक्का झाल्यानंतर एका क्षणात त्याने पलटी मारली. त्यामुळे रितेश भाऊ अरबाजची शाळा घेणार आहे.
भाऊच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणाला,"अरबाज स्ट्राँग प्लेअर ही इमेज तुम्ही जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे. त्यावर अरबाज म्हणतो,"सर मी केअर करतोय कोणाची तरी". त्यावर अरबाजला थांबवत रितेश भाऊ म्हणतो,"तुम्हाला समजत नाही...तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतं". त्यानंतर घरातील इतर सदस्यांना रितेश भाऊ प्रश्न विचारतो की,"इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता?".