'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 13:25 IST2023-05-26T13:24:38+5:302023-05-26T13:25:31+5:30
Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल शोमधून अभिजीत सावंत घराघरात पोहचला आहे. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असला तरी सोशल मीडियावर सक्रीय असतो.

'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत
छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो इंडियन आयडॉल(Indian Idol)मध्ये सहभागी झालेले स्पर्धकांचे संपू्र्ण आयुष्य बदलले. इंडियन आयडल स्पर्धेचे विजेते ठरलेले गायक चांगलेच लोकप्रिय झाले. इंडियन आयडलच्या पहिले पर्वाचा किताब गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने जिंकला. आजही तो तितकाच प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अभिजीत सावंत लाईमलाईटपासून दूर आहे. यावरुनच एका नेटकऱ्याने त्याला प्रश्न विचारला आणि ज्यावरुन चांगलाच संतापला आहे.
इंडियन आयडॉल शोमधून अभिजीत सावंत घराघरात पोहचला आहे. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असला तरी सोशल मीडियावर सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी अभिजीतने एक हिंदी गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुन एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिजीतने त्या नेटकऱ्याला चांगलेच सुनावले.
अभिजीतने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली की, भावा, इंडियन आयडॉलनंतर तू मेहनत केली नाही, असे मला वैयक्तिकरित्या वाटते. याचा राग मानू नकोस.त्यावर अभिजीतने उत्तर देताना लिहिले की, कदाचित, पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावर त्या नेटकऱ्याने मी गाणं गायला लागलो, त्याचे मुख्य कारण तू होता आणि आता जेव्हा नवीन लोकांना काम मिळताना पाहतो आणि तुमच्यासारख्यांना काम मिळत नाही हे पाहतो, तेव्हा खरंच मला वाईट वाटते. पण तरीही तुला शुभेच्छा, असे म्हटले.