"तू अजूनही आमच्यासाठी तेवढाच छोट्या गुंड्या आहेस..", लेकाच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:55 IST2025-12-19T16:54:10+5:302025-12-19T16:55:06+5:30
Prasad Khandekar : प्रसाद खांडेकरने मुलगा श्लोकच्या नवव्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

"तू अजूनही आमच्यासाठी तेवढाच छोट्या गुंड्या आहेस..", लेकाच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची खास पोस्ट
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीरांना लोकप्रियता मिळाली आहे. प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar)देखील महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहचला आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता प्रसाद खांडेकरने मुलगा श्लोकच्या नवव्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद खांडेकरने मुलगा श्लोकच्या नवव्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आणि लिहिले की, "हॅप्पीवाला बर्थडे माय टायगर. श्लोक आज तुझा नववा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खुप आभाळभर शुभेच्छा गुंड्या... तुझ्याकडे बघून वाटत नाहीच की तुझं वय वाढलंय ...कारण तू अजूनही आमच्यासाठी तेवढाच छोट्या गुंड्या आहेस. पण तुझं बोलणं ऐकतो तेव्हा वाटत तू मोठा होतोयेस.."
त्याने पुढे लिहिले की, "बाबा मला हे गिफ्ट हवंय" इथपासून "बाबा मला गिफ्ट नको आपण बड्डेच्या दिवशी सगळे एकत्र कुठेतरी जाऊया." हे वाक्य जेव्हा ऐकतो तेव्हा जाणीव होते तू मोठा झालायेस... गेल्या वर्षीच्या तश्या तुझ्या खूप आचिव्हमेंट होत्या पण १-आंतरशालेय डान्स कॉम्पिटिशनमध्ये मुंबईतून तू पहिला आलास
आणि दुसऱ्या दुसऱ्या सिनेमात तू यशस्वी काम केलंस. ह्या दोन्ही गोष्टींचा अभिमान वाटतो. येत्या वर्षी हवा तसा बागड... तुला आवडत्या क्षेत्रात मुसाफिरी कर...हसत राहा...अभ्यास कर...मज्जा कर...आणि अशीच सगळ्याची काळजी घे. बाकी मी, मम्मी, आई, मम्मी आई, आत्या मावश्या काका मामा दादा ताई सगळे आहोतच. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खुप खुप खुप शुभेच्छा बाळा."