'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 11:33 IST2024-04-26T11:32:21+5:302024-04-26T11:33:13+5:30

शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साखरपुड्यानंतर आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचा मुहुर्त ठरला आहे.

yeu kashi tashi me nandayla fame actor Shalva Kinjawadekar to tie knot with gf | 'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे

'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे

'येऊ तशी कशी मी नांदायला' मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोहोचला. या मालिकेतील ओमकारच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाबरोबरच शाल्व त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता शाल्वच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नाचा मुहुर्त ठरला असून लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे. 

शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या वर्षी शाल्व आणि श्रेयाने साखरपुडा केला होता. मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. साखरपुड्यानंतर आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचा मुहुर्त ठरला आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टा स्टोरीवरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. शाल्वबरोबरचा फोटो शेअर करत श्रेयाने मुहुर्त असं कॅप्शन दिलं आहे. पण, अद्याप त्यांनी लग्नाच्या तारखेबाबत उलगडा केलेला नाही. 

गेल्या काही वर्षांपासून शाल्व आणि श्रेया रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, सध्या शाल्व झी मराठीवरील 'शिवा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: yeu kashi tashi me nandayla fame actor Shalva Kinjawadekar to tie knot with gf