Shalva Kinjawadekar : ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, कोण आहे शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:56 IST2023-02-13T12:53:12+5:302023-02-13T12:56:26+5:30

Actor Shalv Kinjawadekar Got Engaged : ओमला रिअल लाईफमध्ये त्याची स्वीटू भेटली आहे. होय, काल शाल्वचा साखरपुडा पार पडला.

Yeu Kashi Tashi Me Nandayla Actor Shalv Kinjawadekar Got Engaged With Shreya Daflapurka | Shalva Kinjawadekar : ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, कोण आहे शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू

Shalva Kinjawadekar : ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, कोण आहे शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू

'येऊ कशी तशी मी नांदायला' ( Yeu Kashi Tashi Me Nandayla) मालिका आली तशी गाजली.  मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. पण ओम आणि स्वीटूची जोडी विशेष गाजली. ही जोडी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. मालिकेत ओमची भूमिका अभिनेता शाल्व किंजवडेकरने (Shalva Kinjawadekar ) साकारली हाेती. तर स्वीटूची भूमिका अन्विता फलटणकरने जिवंत केली होती. आता काय तर ओमला रिअल लाईफमध्ये त्याची स्वीटू भेटली आहे. होय, काल शाल्वचा साखरपुडा पार पडला. गर्लफ्रेन्ड श्रेया डफळापुरकशी त्याने साखरपुडा केला. लवकरच शाल्व व श्रेया लग्नबंधनात अडकणार आहेत.

गेल्या दोन तीन दिवसांपासून शाल्व व श्रेयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या फोटोंमध्ये श्रेयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसली होती. फोटोत शाल्वही दिसला होता. त्यामुळे हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण ही सगळी साखपुड्याची तयारी होती. शाल्वने साखरपुड्याचा एक फोटो पोस्ट करत, ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

शाल्व आणि श्रेया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं.

श्रेया ही व्यवसायाने फॅनन डिझायनर आहे. सोबत ती स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे. अनेक कपड्यांच्या साड्यांच्या ब्रॅण्डसाठी श्रेयाने मॉडेलिंग केलं आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 
त्यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते.

Web Title: Yeu Kashi Tashi Me Nandayla Actor Shalv Kinjawadekar Got Engaged With Shreya Daflapurka