जस्मिन भसिन ह्या कारणामुळे करतेय योगाभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 14:55 IST2019-01-02T14:53:30+5:302019-01-02T14:55:00+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जस्मिन भसिन स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो हॅपी है जी' मालिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Yasmin Bhasin is taking lesson of yoga | जस्मिन भसिन ह्या कारणामुळे करतेय योगाभ्यास

जस्मिन भसिन ह्या कारणामुळे करतेय योगाभ्यास

ठळक मुद्दे 'दिल तो हॅपी है जी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाजस्मिन भसिन दिसणार पंजाबी मुलीच्या भूमिकेत


छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जस्मिन भसिन स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो हॅपी है जी' मालिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'दिल तो हॅपी है जी' मालिका १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत जस्मिन हॅपीच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेची ती तयारी करत असून त्यासाठी योगाभ्यास करायला तिने सुरूवात केली आहे.


जस्मिन 'दिल तो हॅपी है जी' मालिकेत पंजाबमधील एक तरूण मुलगी हॅपीची भूमिका करणार असून ती जिथे कुठे जाईल तिथे केवळ आनंद पसरवणे हाच तिचा हेतू आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ती म्हणाली, 'हॅपीची व्यक्तिरेखा खूप साधी पण तरीही रोचक आहे. ह्या भूमिकेची तयारी करण्यासाठी मी प्राणायाम आणि योगाभ्यास करायला सुरूवात केली आहे. मला वाटते हे करून मला आतून छान वाटेल आणि मी माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेन. मी रोज सकाळी एक तास सराव करते. मला माझ्यात फरक जाणवायला लागला असून त्याबद्दल खूप मस्तही वाटते आहे.'
'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये जास्मीन बबली गर्लच्या रोलमध्ये दिसत आहेत. यापूर्वी जस्मिन कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका दिल से दिल तकमध्ये टेनीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. आता ती हॅपीच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'दिल तो हॅपी है जी' १५ जानेवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: Yasmin Bhasin is taking lesson of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.