'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:40 AM2022-02-05T11:40:18+5:302022-02-05T11:40:51+5:30

Aai Kuthe Kay Karte:'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे.

Will there be a new character entry in 'Aai Kuthe Kay Karte?', Find out about it | 'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल

'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. दरम्यान, आता असे समजते आहे की, आई कुठे काय करते मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 

आई कुठे काय करते मालिका दाखल झाल्यानंतर या मालिकेचा रिमेक अनुपमा प्रेक्षकांच्या भेटीला आली. अनुपमालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भलेही अनुपमा मालिका आई कुठे काय करतेनंतर प्रसारीत झाली असली तरी ती कथानकाच्या बाबतीत पुढे आहे. त्यामुळे काही प्रेक्षक अनुपमा आणि आई कुठे काय करते या दोन्ही मालिका पाहतात. बऱ्याचदा काही प्रेक्षक त्या दोन्ही मालिकेच्या कथानकाची तुलनादेखील करताना दिसतात. 

नवीन पात्राची एन्ट्री
दरम्यान आई कुठे काय करतेमध्ये आशुतोषला अरुंधतीच्या पुन्हा प्रेमात पडल्याची जाणीव होणार आहे. तसेच मालिकेत आता नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. ते पात्र म्हणजे आशुतोषची बहिण. अनुपमा मालिकेत ही भूमिका अभिनेत्री अनेरी वजानी साकारते आहे. त्यामुळे आई कुठे काय करतेमध्ये आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.   

अनिरुद्धचा होणार जळफळाट
आई कुठे काय करतेच्या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच भेटीला आला आहे. त्यात एका कॅफेमध्ये आशुतोष आणि अरुंधती बसलेले पाहायला मिळत आहेत. तर तिथल्याच दुसऱ्या टेबलवर अनिरुद्धही पाहायला मिळतो आहे. दरम्यान तिथे एक जण अरुंधतीसोबत सेल्फी घेऊ का विचारते आणि ती होकारही देते. हे पाहून अनिरूद्धचा जळफळाट होतो. तो तिथून निघून जात असतो त्याचा धक्का वेटरला लागतो. अनिरूद्ध त्या वेटरसोबत हुज्जत घालू लागतो. तेव्हा तिथला मॅनेजर अनिरूद्धला धमकी देतो की तुमची पोलिसात तक्रार करू. तितक्यात आशुतोष हा वाद थांबवतो. अनिरुद्धला आशुतोष म्हणतो आवरा स्वतःला. स्वतःचा रिस्पेक्ट गमावू नका. त्यावर चिडून आशुतोषला अनिरूद्ध म्हणतो की तू कोण बोलणारा. त्यावर आशुतोष त्याला तू इथून निघून गेलास तर बरे होईल असे म्हणतो. 

Web Title: Will there be a new character entry in 'Aai Kuthe Kay Karte?', Find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.