'तारक मेहता...' मालिकेत जुनी 'सोनू' १४ वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार? अभिनेत्री म्हणाली- "मी सध्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:30 IST2026-01-23T15:26:21+5:302026-01-23T15:30:32+5:30

'तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत झळकणारी सोनू अर्थात अभिनेत्री झील मेहता मालिकेत पुन्हा दिसणार असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने खुलासा केला आहे

Will sonu actress jheel mehta comeback in Taarak Mehta ka ooltah chashma | 'तारक मेहता...' मालिकेत जुनी 'सोनू' १४ वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार? अभिनेत्री म्हणाली- "मी सध्या..."

'तारक मेहता...' मालिकेत जुनी 'सोनू' १४ वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार? अभिनेत्री म्हणाली- "मी सध्या..."

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. विशेषतः 'टप्पू सेना'मधील भिडे मास्तरांची लाडकी मुलगी 'सोनू' हे पात्र खूप गाजले. आता ही भूमिका साकारणारी पहिली अभिनेत्री झील मेहता (Jheel Mehta) चर्चेत आली असून, ती मालिकेत पुन्हा दिसणार अशी चर्चा आहे.

झील मालिकेत दिसणार का?

गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर झील मेहता पुन्हा एकदा अभिनयात पदार्पण करणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, झीलने तिच्या एका व्लॉगमध्ये यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, "मला हा प्रश्न वारंवार विचारला जातो की मी 'तारक मेहता...' मध्ये परतणार का? पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी सध्या तरी अभिनयात किंवा या मालिकेत परतण्याचा कोणताही विचार करत नाहीये." झीलने स्वतःच हे सांगितल्याने तिच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे.


अभिनय सोडण्याचे नेमके कारण काय?

झीलने २०१२ मध्ये ही मालिका सोडली होती. त्यावेळी ती दहावीत होती आणि तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. तिने स्पष्ट केले की, उंची जास्त असल्यामुळे तिला मालिकेतून काढले गेले, या निव्वळ अफवा आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तिने स्वतःहून हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मालिकेला रामराम ठोकल्यानंतर झीलने तिचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती एक यशस्वी बिझनेसवुमन असून आपली आई आणि पती आदित्य दुबे यांच्यासोबत व्यवसायात करत आहे. तिने सांगितले की, "अभिनय करणे हे माझे लहानपणाचे स्वप्न होते, जे मी या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले. आता मला माझे भविष्य व्यवसायात घडवायचे आहे."

 झील मेहता नुकतीच तिच्या विवाहबंधनामुळे चर्चेत आली होती. जानेवारी २०२५ मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबे याच्याशी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. जरी झील मेहता सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत परतणार नसली, तरी जुन्या 'सोनू'च्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

Web Title: Will sonu actress jheel mehta comeback in Taarak Mehta ka ooltah chashma