बहिणीच्या सुखासाठी फाल्गुनी आपल्या मातृत्त्वाचा त्याग करील काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:17 IST2018-02-01T11:47:33+5:302018-02-01T17:17:33+5:30

छोट्या पडद्यावरील ‘जीजी माँ’ मालिकेचे कथानक आता नव्या उंबरठ्यावर उभे असून फाल्गुनीला कमीपणा आणण्यासाठी उत्तरादेवी वेगवेगळे डावपेच आखत आहे. ...

Will Falguni abandon his motherhood for the sister's happiness? | बहिणीच्या सुखासाठी फाल्गुनी आपल्या मातृत्त्वाचा त्याग करील काय?

बहिणीच्या सुखासाठी फाल्गुनी आपल्या मातृत्त्वाचा त्याग करील काय?

ट्या पडद्यावरील ‘जीजी माँ’ मालिकेचे कथानक आता नव्या उंबरठ्यावर उभे असून फाल्गुनीला कमीपणा आणण्यासाठी उत्तरादेवी वेगवेगळे डावपेच आखत आहे. पण त्यामुळे फाल्गुनी आणि तिच्या बहिणीतील नि:स्वार्थी भगिनीप्रेम अधिकच उफाळून येत आहे.फाल्गुनी ही तिच्या बहिणीसाठी शक्तीचा आधारस्तंभ बनली असून तिच्यावर येणा-या सर्व आव्हानांना तोंड देण्यास ती सिध्द झाली आहे.इतकी की आपल्या बहिणीच्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तिची तयारी आहे.मालिकेच्या कथानकाचा उत्कर्षबिंदू आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे की आपल्या बहिणीच्या सुखासाठी फाल्गुनीलाआपल्या मातृत्त्वाचा त्याग करण्याची वेळ येणार आहे. आपल्या बहिणीसाठी मातृत्त्वापासून कायमचे वंचित राहायचे की नाही,याचा निर्णय तिला घ्यावा लागणार आहे. या परमोच्च त्यागासाठी फाल्गुनी तयार होईल का? उत्तरादेवी रावत यांनी टाकलेल्या प्रत्येक डावपेचाला चोख उत्तर देताना फाल्गुनी (तन्वी डोग्रा) आपल्या बहिणीच्या पाठीशी ध्रुव ता-यासाखी अढळ राहिली आहे. परंतु नियती या आपल्या धाकट्या बहिणीवरील सर्व संकटे झेलण्यास फाल्गुनी नेहमीच तयार असते. आता मालिकेचे कथानक कोणते वळण घेते आणि फाल्गुनी कोणता निर्णय घेते, ते पाहणे रंजक ठरेल.फाल्गुनीची भूमिका साकारणारी तन्वी डोग्रा म्हणाली, “प्रेक्षकांकडून ‘जीजी माँ’ मालिकेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आमची सर्व टीम अतिशय सुखावली आहे.या मालिकेच्या ख-या कथाभागाला आता प्रारंभ होत असून यापुढे त्याला रंजक वळणे मिळणार आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होण्यासाठी आम्ही सारेच अतिशय मेहनत घेत आहोत. प्रेक्षक आमची मालिका यापुढेही पाहात राहतील, अशी आशा आहे.”


Also Read:केवळ 75 रू होती अभिनेत्री पल्लवी प्रधानची पहिली कमाई

अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत. शेवटी  आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो. त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.म्हणूनच ‘जीजी माँ’ मालिकेत उत्तरादेवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचा रंगमंचावर काम केल्यानंतर  टीव्ही मालिकांकडे वळल्या.एकांकिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस प्रारंभ केलेल्या पल्लवी प्रधानला पहिल्या मानधनापोटी केवळ 75 रुपयांचा धनादेश मिळाला होता. तीन तासांच्या चित्रपटासाठी शेकडो रुपये मोजावे लागण्याच्या काळात केवळ 75 रुपयांवरून प्रारंभ करून रंगमंचाकडून रुपेरी पडद्याच्या दिशेने केलेला व्यावसायिक प्रवास आणि यादरम्यान कमावलेले नाव ही तिची मोठीच कमाई म्हणावी लागेल.पल्लवी प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री असून तिनं फक्त मराठी रंगमंचच नाहीतर गुजराती रंगमंचही गाजवला. गुजराती रंगमंचावर अभिनय करून तिने आता हिंदी टीव्ही मालिकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Will Falguni abandon his motherhood for the sister's happiness?