"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:52 IST2025-09-06T18:51:47+5:302025-09-06T18:52:25+5:30
Rutuja Bagwe: अभिनेत्री ऋतुजा बागवेने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले आहे.

"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले आहे. तिने विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले.
ऋतुजा बागवेने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. नातं टिकवायला १९-२० करावं लागतं. तुम्हाला जोडीदार हवा असं का वाटत नाही, असं ऋतुजा बागवेला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, ''कधी कधी काही लोकांना मिळत नाही योग्य जोडीदार. ती वाइब मॅच नाही होत आणि दोन स्वतंत्र चांगली माणसं कपल म्हणून चांगली असतीलच असं नाहीये. काहींचं असंच असतं की मला नाहीच करायचंय. त्यांना जबाबदारी नको असते किंवा ते त्यांचं स्वातंत्र्य जे काही आहे तो एन्जॉय करत असतात. काही लोक करियरस्टिक खूप असतात. अशी बरीच कारणं आहेत त्याला आमच्या काळातल्या मुली त्यांना एडजस्टमेंट म्हणजे सॅक्रीफाइज काहीतरी केलंय आपण असं वाटतं. पण कुठलंही नातं जपण्यासाठी नातं निभवून नेण्यासाठी काही ना काहीतरी उन्नीस बिस करावंच लागतं. कधी इगो बाजूला ठेवायला लागतो. कधी सेल्फ रिस्पेक्ट काही काळ शिथिल करावा लागतो. तो असावाच, कायम असावाच. पण योग्य ठिकाणी योग्य जागी तो बोलून दाखवला गेला पाहिजे.''
''ज्यांना मी आवडते ते मला...''
ती पुढे म्हणाली की, ''काही लोकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक नाही कळत.तर त्यांना असं वाटतं माझं माझं जमतंय. मी माझं माझं करतेय मी खूश आहे. मला कोणाची गरज नाही आहे. तर गरजेसाठी पार्टनर तसाही नसावाच तो जीवनात आपल्या बरोबर कोणीतरी असावा आपल्या हक्काचं म्हणून तो असावा तर स्वतंत्र असलो तरी कोणीतरी एक असावं असं मला वाटतं आणि मी माझं ते कारण आहे की मला ते गणित जुळत नाहीये. मला आवडणाऱ्यांना मी आवडत नाहीये. ज्यांना मी आवडते ते मला अजिबात आवडत नाहीयेत. तर गणित जुळेल जुळलं की मग होऊन जाईल.''