Wedding Anniversary : हॉस्पिटलमध्ये नवऱ्यासोबत दिव्यांका त्रिपाठीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:23 IST2019-07-08T18:23:15+5:302019-07-08T18:23:43+5:30
छोट्या पडद्यावरील सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय कपल दिव्यांका त्रिपाठी व विवेक दहियाने ८जुलैला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

Wedding Anniversary : हॉस्पिटलमध्ये नवऱ्यासोबत दिव्यांका त्रिपाठीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस
छोट्या पडद्यावरील सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय कपल दिव्यांका त्रिपाठी व विवेक दहियाने ८जुलैला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. मात्र यावेळेस दिव्यांका व विवेक यांनी त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी कोणत्या रोमँटिक लोकेशनवर नाही तर हॉस्पिटलमध्ये साजरी केली.
खरेतर विवेक दहियाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मकाऊमधून सुट्टी व्यतित करून भारतात परतल्यानंतर विवेकची तब्येत अचानक बिगडली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विवेकच्या रिपोर्टमध्ये इंटेस्टाइनल इंफेक्शन आणि लिवर एबिसची समस्या समोर आली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या दिवशी विवेकने हॉस्पिटलमध्ये असल्या कारणामुळे कपलने अॅनिव्हर्सरी साजरी करण्याचा प्लान रद्द केला होता. मात्र विवेक व दिव्यांकाचा खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये केक नेऊन सरप्राईज दिलं.
दिव्यांका व विवेकने हॉस्पिटलमध्ये केक कापून त्यांचा तिसरा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.दिव्यांकाने या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
दिव्यांका व विवेकने ८ जुलै, २०१६ साली भोपाळमध्ये ग्रॅड वेडिंग केले होते. या कपलच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. ते दोघे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मात्र यावेळेस विवेक आजारी असल्यामुळे ते त्यांचा खास दिवस नीट साजरा करू शकले नाही.
विवेक व दिव्यांका डान्स रिएलिटी शो नच बलिएचा नववा सीझनचा पहिला एपिसोड होस्ट करणार होते. मात्र विवेकची तब्येत बिघडल्यामुळे आता विवेक या एपिसोडचा हिस्सा नसणार आहे.