'व्हॉईस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:03 IST2023-06-21T12:00:38+5:302023-06-21T12:03:39+5:30

त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले मात्र ते अपयशी ठरले.

Voice of India fame singer Mohammad Zakir Hussain passed away due to heart attack | 'व्हॉईस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

'व्हॉईस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

'व्हॉइस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammed Zakir Hussain) यांचं निधन झालं आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. बिलासपुर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्या निधनाने संगीत जगत शोकसागरात बुडाले आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आपल्या आवाजाची जादू पसरवणारे मोहम्मद जाकिर हुसैन आपल्या कुटुंबासोबत बिलासपुर येथे गेले होते. त्यांची तब्येत अचानक खराब झाली. माध्यम रिपोर्ट्सनुसार, त्यांना हार्टअटॅक आला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पुरानी बस्ती, रानी रोड धनवार पारा स्थित आवास येथील त्यांचे परिजन आले. त्यांचे पार्थिव बिलासपुर वरुन छत्तीसगढ येथील कोरबा येथे आणण्यात आले. त्यांच्या आवाजाची जादूच अशी होती की हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.

गायक मोहम्मद जाकिर हुसैन हे लहानपणापासूनच संगीत आणि कला क्षेत्रात होते. त्यांना गायनाची आधीपासूनच आवड होती. त्यांचं बालपण कोरबा येथेच गेलं. नंतर त्यांना व्हॉइस ऑफ इंडियामध्ये संधी मिळाली. इथे त्यांनी आपल्या आवाजाने सर्वांचंच मन जिंकलं. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Voice of India fame singer Mohammad Zakir Hussain passed away due to heart attack