'खतरों के खिलाडी'च्या सेटवर विकास गुप्ता व आदित्य नारायणला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 15:54 IST2018-08-03T15:45:41+5:302018-08-03T15:54:02+5:30
'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना दिसणार आहेत.

'खतरों के खिलाडी'च्या सेटवर विकास गुप्ता व आदित्य नारायणला झाली दुखापत
'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना दिसणार आहेत. या स्टंटदरम्यान गायक व निवेदक आदित्य नारायण आणि बिग बॉस फेम विकास गुप्ता या स्पर्धकांना दुखापत झाल्याचे समजते आहे.
'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनच्या चित्रीकरणावेळी एका स्टंटदरम्यान आदित्य नारायणच्या डोळ्याला दुखापत झाली. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका स्टंटदरम्यान विकास गुप्ताला साप चावला. त्याला काही इंजेक्शन्स दिले असून बरा होण्यास काही दिवस लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
प्रत्येक स्टंट स्पर्धकांना करण्यास सांगण्यापूर्वी शोच्या टीमकडून सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाते. या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी स्वत: सुरक्षेबाबत खातरजमा करून घेत असतो. तसंच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घटना घडल्याचं शोच्या टीमकडून म्हटलं जात आहे. या घटनांमुळे रोहितनेही सेटवर राग व्यक्त केला. स्पर्धकांच्या सुरक्षेची अधिक काळजी यापुढे घेतली जाईल अशी ग्वाही टीमकडून देण्यात आली आहे. 'खतरों के खिलाडी'चा हा नववा सीझन असून यात विकास गुप्ता, अविका गौर, हर्ष, भारती, पुनीत, स्मिता शेट्टी, अविका गौर या कलाकारांचा समावेश आहे.