प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:17 IST2025-09-28T15:16:15+5:302025-09-28T15:17:32+5:30
'वीकेंड का वार'मध्ये प्रणित मोरे पुन्हा चमकला, वरुण धवनला म्हणाला...

प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
'बिग बॉस १९' मध्ये सध्या रोज मजेशीर घडामोडी घडत आहेत. आपला मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेही बिग बॉस गाजवत आहे. काही दिवसांपूर्वी अमाल मलिक आणि काही सदस्यांनी प्रणितच्या लूक्सवरुन त्याची खिल्ली उडवली. तेव्हा अनेक मराठी प्रेक्षक, इन्फ्लुएन्सर्स त्याच्यासाठी उभे राहिले. प्रणितने याआधी त्याच्या शोजमध्ये सलमान खानवर जोक केले होते. त्यावरुन सलमानने त्याला 'वीकेंड का वार'मध्ये झापलं होतं. आता नुकतंच अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर बिग बॉसच्या स्टेजवर आले होते. तेव्हा वरुण धवन प्रणितला पाहून काय म्हणाला बघा
बिग बॉसच्या यावेळच्या वीकेंड का वारचा एक प्रोमो आऊट झाला आहे. यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ हे आगामी सिनेमा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. जेव्हा हे सेलिब्रिटी घरातील सदस्यांशी बोलतात तेव्हा वरुण धवन प्रणितकडे बोट दाखवून म्हणतो, 'याने तर माझीही खिल्ली उडवली आहे'. सलमानही प्रणितकडे पाहतो. तेव्हा प्रणित म्हणतो, 'आता मी बॉलिवूडचे सगळे जोक्स विसरुन गेलोय'. यावर सगळेच हसतात.
जान्हवी कपूरशी प्रणितचं कनेक्शन काय?
प्रणित मोरे मधल्या काळात एका घटनेमुळे प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने आपल्या शोमध्ये अभिनेता वीर पहाडियावर जोक केला होता. त्या जोकवरुन वीर पहाडियाच्या चाहत्यांनी प्रणित मोरेच्या शोमध्ये येऊन तोडफोड केली होती. तसंच त्याला मारहाणही केली होती. यामुळे प्रणित आणखी व्हायरल झाला आणि त्याला नंतर थेट बिग बॉसचीच ऑफर आली. वीर पहाडिया हा बिझनेसमन शिखर पहाडियाचा सख्खा भाऊ आहे. शिखर पहाडिया जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे. त्या घटनेनंतर पहिल्यांदाच जान्हवी आणि प्रणित मोरे असे समोरासमोर आले आहेत.