Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 06:18 PM2022-10-16T18:18:23+5:302022-10-16T18:18:59+5:30

Vaishali Takkar Suicide: 'यह रिश्ता क्या कहता है', 'ससुराल सिमर का' आणि बिग बॉससह अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या वैशाली ठक्करने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Vaishali Takkar Suicide: Was Vaishali Takkar's ex-boyfriend harassing her? Police claim... | Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा...

Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा...

googlenewsNext

Vaishali Takkar Suicide: स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग येथील तिच्या घरी आढळून आला. वैशालीच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. वैशालीच्या सुसाइड नोटमधून एक्स बॉयफ्रेंडवर संशयाची सुई गेली आहे.

एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा?
अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती इंदूरच्या तेजाजी नगर पोलीस ठाण्यातून मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटनुसार ती अस्वस्थ होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत होता. वैशालीचे प्रेमसंबंध होते, पण ती सध्या कोणत्याही नात्यात नव्हती. सुसाईड नोटमध्ये एका व्यक्तीचे नावही घेण्यात आले आहे.

स्टार प्लस शोमधून लोकप्रियता मिळाली
वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष-अमृत' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.

बिग बॉसमध्येही सहभाग
तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती.'सुसरल सिमर का 2' मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारण्यासाठी तिला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन पेटल पुरस्कार देखील मिळाला आहे. वैशालीने बिग बॉसमध्येही सहभागी घेतला होता. वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. ती गेल्या 1 वर्षापासून इंदूर येथे तिच्या घरी राहत होती. 

Web Title: Vaishali Takkar Suicide: Was Vaishali Takkar's ex-boyfriend harassing her? Police claim...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.