ऑनस्क्रीन वकील ऊर्जा शिंदेने घेतली ख्यातनाम वकील उज्वल निकम यांची भेट, सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:08 IST2026-01-12T14:06:01+5:302026-01-12T14:08:02+5:30

जेव्हा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन वकील एकत्र येतात. अनुष्का सरकटेने घेतली उज्वल निकम यांची भेट. सांगितला अनुभव

vachan dile tu mala fame actress anushka sarkate met expert lawyer Ujjwal Nikam | ऑनस्क्रीन वकील ऊर्जा शिंदेने घेतली ख्यातनाम वकील उज्वल निकम यांची भेट, सांगितला अनुभव

ऑनस्क्रीन वकील ऊर्जा शिंदेने घेतली ख्यातनाम वकील उज्वल निकम यांची भेट, सांगितला अनुभव

स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे. पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली. 

या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, ‘उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.’ एकूणच ऑनस्क्रीन वकील अनुष्काने खऱ्या आयुष्यातील वकील उज्वल निकम यांची घेतलेली भेट तिच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरली.


खास बाब म्हणजे, निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाचा ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करणार हे पहाण्यासाठी सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अनुष्का सरकटे आणि मिलिंद गवळी या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'वचन दिले तू मला' मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

Web Title : ऑन-स्क्रीन वकील ऊर्जा शिंदे ने उज्वल निकम से मुलाकात की, अनुभव साझा किया।

Web Summary : अभिनेत्री अनुष्का सरकटे, वकील ऊर्जा शिंदे की भूमिका निभाते हुए, अपने पहले मामले से पहले प्रसिद्ध वकील उज्वल निकम से मिलीं। उन्होंने आशीर्वाद और अमूल्य सलाह प्राप्त की। ऊर्जा अदालत में हर्षवर्धन जहागिरदार का सामना करेंगी। 'वचन दिले तू मला' श्रृंखला स्टार प्रवाह पर रात 9:30 बजे प्रसारित होती है।

Web Title : On-screen lawyer Urja Shinde meets Ujjwal Nikam, shares her experience.

Web Summary : Actress Anushka Sarkate, portraying lawyer Urja Shinde, met renowned lawyer Ujjwal Nikam before her first case. She gained blessings and invaluable advice. Urja will face Harshvardhan Jahagirdar in court. The series 'Vachan Dile Tu Mala' airs on Star Pravah at 9:30 PM.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.