खुपते तिथे गुप्ते: लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने बदलला धर्म? स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 12:36 IST2023-07-04T12:35:20+5:302023-07-04T12:36:21+5:30

Urmila matondkar: या मंचावर उर्मिलाने तिच्या धर्मपरिवर्तन केल्याच्या चर्चांवर उघडपणे भाष्य करत अनेकांची तोंडं बंद केली आहेत.

urmila matondkar in khupte tithe gupte actress talks about refuting rumours of converting to islam after marriage | खुपते तिथे गुप्ते: लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने बदलला धर्म? स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली...

खुपते तिथे गुप्ते: लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने बदलला धर्म? स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली...

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम सुरु झाला आहे. तब्बल १० वर्षानंतर सुरु झालेल्या या कार्यक्रमाची रंगत आजही तितकीच आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे या मंचावर उपस्थित राहिलेल्या सगळ्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्येच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) हिने तिच्या करिअरसोबत पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यामध्येच तिने लग्नानंतर धर्मपरिवर्तनाविषयीदेखील तिचं मत मांडलं आहे.

सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते यांनी उर्मिला हिला राजकीय विषयांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारले. यात राजकारणात आल्यानंतर तू धर्मांतर केलं हे खरं आहे का? असा प्रश्न अवधूतने तिला विचारला. या प्रश्नाचं तिने पहिल्यांदाच उघडपणे उत्तर दिलं आहे.

उर्मिलाने खरंच बदलला धर्म?


"माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी कधीही मला धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. मी नेहमी हिंदू असेन. मी माझा धर्म बदललेला नाही", असं उर्मिलाने या मंचावर सांगितलं.

दरम्यान, या मंचावर उर्मिलाने तिच्या धर्मपरिवर्तन केल्याच्या चर्चांवर उघडपणे भाष्य करत अनेकांची तोंडं बंद केली आहेत. उर्मिलाने मोहसिन अख्तर सोबत लग्न केलं आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिन यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 
 

Web Title: urmila matondkar in khupte tithe gupte actress talks about refuting rumours of converting to islam after marriage