Urfi Javed : 'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:15 IST2023-01-13T18:13:41+5:302023-01-13T18:15:37+5:30

सद्गुरु यांच्या एका विषयावरील व्हिडिओवर उर्फी चांगलीच भडकली दिसतेय.

urfi javed takes dig at sadhguru regarding his statement on LGBTQ community | Urfi Javed : 'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका

Urfi Javed : 'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका

Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या बोल्ड कपड्यांमुळे आणि तिच्या बिंधास्त विचारांमुळे चर्चेत असते. तिच्यावर टीका करणारे तर काही कमी नाहीत पण आता ती सुद्धा अनेकांवर टीका करत असते. आता तर तिने थेट सद्गुरुंवरच टीका केली आहे. एवढंच नाही तर या नेत्याला जे फॉलो करत असतील त्यांनी मला अनफॉलो करावे असे म्हणले आहे.

इशा फाऊंडेशनचे संचालक सद्गुरु  (Sadhguru) यांचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. सद्गुरु यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये 'एलजीबीटीक्यू (LGBTQ) यांच्या मोहिमेवर टीका केली आहे. समाजातील काही लोकांनी या विषयावर इतकी मोठी मोहीम सुरु करण्याची गरज नाही असं ते म्हणतात.' 

सद्गुरु यांच्या याच विधानावर उर्फीला राग आला. ती म्हणाली, 'जे या कट्टरपंथी नेत्याला फॉलो करतात त्यांनी मला अनफॉलो करा. एलजीबीटीक्यू ही यांच्या मताप्रमाणे फक्त एक मोहिम आहे. मात्र त्यांना माहित नाही या मोहिममेमुळे या लोकांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं आहे.'

 तिने आणखी एक स्टोरी ठेवली आणि लिहिले, 'अशा प्रकारच्या अजेंड्याला प्रोत्साहन देऊ नका. एलजीबीटीक्यू समाजाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अनेक दशकांपासून या लोकांना समाजात आपलं सत्य सांगणे कठीण गेले. मात्र आता अशा मोहिमांमुळे ते सुद्धा जसे आहेत तसे जगू शकतात हा आत्मविश्वास त्यांना मिळाला आहे.'

uorfi javed instagram story

'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण

सध्या उर्फी जावेदवरुन राजकीय वातावरणही तापले आहे. एकीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यात वाद सुरु आहे तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.  हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. शेवटी उर्फी मात्र तिचं वागणं काही सोडताना दिसत नाही.

Web Title: urfi javed takes dig at sadhguru regarding his statement on LGBTQ community