हद्दचं झाली! भर पार्टीत अभिनेत्रीने सगळ्यांसमोर उतरवले कपडे; video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:57 IST2022-05-22T16:57:12+5:302022-05-22T16:57:38+5:30
Urfi javed: उर्फीने परिधान केलेला ड्रेस जवळपास २० किलो वजनाचा होता. ज्यामुळे तो सांभाळणं तिला अशक्य झालं होतं.

हद्दचं झाली! भर पार्टीत अभिनेत्रीने सगळ्यांसमोर उतरवले कपडे; video व्हायरल
'बिग बॉस ओटीटी' या शोमुळे घराघरात परिचित झालेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed). अभिनयशैलीपेक्षा उर्फी तिच्या बोल्डनेसमुळे आणि चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असते. अनेकदा काहीच्या काही कपडे परिधान करुन ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावेळी मात्र, उर्फीने हद्दच केली आहे. कॅमेरासमोर तिने कपडे उतरवण्यास सुरुवात केली. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सध्या उर्फीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. इतकंत नाही तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी एका पार्टीमध्ये सहभागी झाली अलून तिने काचेपासून तयार केलेला ड्रेस परिधान केला. परंतु, या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटल्यामुळे तिने पार्टीमध्ये कॅमेरासमोरच कपडे उतरवण्यास सुरुवात केली. जे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, उर्फीने परिधान केलेला ड्रेस जवळपास २० किलो वजनाचा होता. ज्यामुळे तो सांभाळणं तिला अशक्य झालं होतं. त्यामुळे कंटाळून उर्फीने काचेपासून तयार केलेलं ड्रेसवरील जाळीदार जॅकेट काढलं आणि आहे त्या साध्या ड्रेसमध्ये पार्टीत सहभागी झाली. परंतु, तिचा हा विचित्रपणा पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.