उर्फी जावेदला कपड्यांची अॅलर्जी! का घालत नाही पूर्ण कपडे? PHOTO शेअर करत स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:02 IST2023-01-07T16:54:21+5:302023-01-07T17:02:19+5:30
उर्फी जावेदने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये काही क्पिप्स अॅड केल्या आहेत. या व्हिडिओमधून उर्फी तिच्या संपूर्ण पायावर छोटी-छोटी पुरळ आल्याचे दाखवत आहे.

उर्फी जावेदला कपड्यांची अॅलर्जी! का घालत नाही पूर्ण कपडे? PHOTO शेअर करत स्पष्टच सांगितलं!
उर्फी जावेदने, ती पूर्ण कपडे का परिधान करत नाही? यासंदर्भात भाष्य केले आहे. इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर करत, आपल्याला कपड्यांची अॅलर्जी असल्याने आपण पूर्ण कपडे घालत नाही, असे उर्फीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर उर्फी उलनच्या कपड्यांवर दिसून आली होती.
उर्फी जावेद का परिधान करत नाही पूर्ण कपडे?
उर्फी जावेदने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये काही क्पिप्स अॅड केल्या आहेत. या व्हिडिओमधून उर्फी तिच्या संपूर्ण पायावर छोटी-छोटी पुरळ आल्याचे दाखवत आहे. उर्फी जावेदने या व्हिडिओंमध्ये म्हटले आहे की, जेव्हा मी उलनचे अथवा पूर्ण कपडे घालते, तेव्हा असे होते. माझ्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. ही अत्यंत गंभीर समस्या आहे.
उर्फीला उलनचे कपडे परिधान केल्यामुळे झाली अॅलर्जी! -
आपल्या पायावर आलेली पुरळं दाखवत उर्फी म्हणाली, तर आता तुम्हाला समजले असेल की, पूर्ण मी कपडे का परिधान करत नाही. कारण माझी अशी अवस्था होते. माझ्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. आपण पुरावा बघितलाच असेल. तर यामुळे मी कपडे परिधान करत नाही. उलनच्या कपड्यांवर डान्स करतानाचा व्हिडिओदेखील उर्फीने शेअर केला आहे.