"मला आशिष कोण माहितंच नव्हतं" होणाऱ्या जावयाबद्दल उदय टिकेकर म्हणाले, 'एका रात्रीत...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:44 IST2023-07-31T15:43:37+5:302023-07-31T15:44:28+5:30
स्वानंदीने आशिषबद्दल घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती

"मला आशिष कोण माहितंच नव्हतं" होणाऱ्या जावयाबद्दल उदय टिकेकर म्हणाले, 'एका रात्रीत...'
'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने अचानक साखरपुडा करत चाहत्यांना धक्काच दिला. एक आठवड्यापूर्वीच स्वानंदीने 'इंडियन आयडॉल' फेम गायक आशिष कुलकर्णीसोबत साखरपुडा केला. यामुळे चाहत्यांना धक्का तर बसलाच शिवाय आनंदही झाला. स्वानंदीने आशिषबद्दल घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेलच. तर स्वत: स्वानंदीचे वडील उदय टिकेकर यांनी 'लोकमत फिल्मी' ला प्रतिक्रिया दिली आहे.
उदय टिकेकर म्हणाले, 'आमच्यात कधीच कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. आम्ही सगळं एकमेकांना सांगतो. त्यामुळे माहिती काढायची, शेरलॉक होम्सगिरी करायची काहीच गरज नव्हती. मला स्वत:ला आशिष कुलकर्णी माहित नव्हता. म्हणून मी, आरती, आरतीची आई आम्ही एका रात्रीत आशिषची इंडियन आयडॉलची सगळी गाणी ऐकली. मग म्हणलं काय गातो हा पोरगा. माझे सगळे मित्र त्याचे चाहते निघाले. माझा साडू मदन कुलकर्णी तर म्हणाला मी तर मुलाकडून येणार. अशा गोष्टी माहितही नसतात पण नंतर कळतात.'
ते पुढे म्हणाले, डिसेंबरमध्ये लग्न असणार आहे. लग्न पुण्यातच होईल कारण आम्ही काय, ते काय पुण्याचेच आहोत. फक्त पुण्यातील जागा खूप सुंदर असेल. स्वानंदी खूप चांगल्या लोकांमध्ये चालली आहे याचा आनंद होतोय.'
उदय टिकेकर सध्या हिंदी मालिकेत काम करत असून स्वानंदीही तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तर स्वानंदीची आई पुण्यात गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असते. लवकरच दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागणार आहेत.