'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:49 IST2023-10-27T13:46:05+5:302023-10-27T13:49:52+5:30
'बिग बॉस 17' च्या घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल
छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. आता 'बिग बॉस' घरातलं वातावरण बदलणार आहे. कारण घरात एक नाही तर दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत.
'बिग बॉस 17' च्या घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे, ज्यांची नावे समर्थ जुरेल आणि मनस्वी मामागाई आहेत. मनस्वीने मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. तर समर्थ एक अभिनेता आहे, जो ईशा मालवीयसोबत 'उदारियां' शोमध्ये दिसला होता.
बीबी हाऊसमध्ये ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यात दररोज लव्ह-हेट अँगल पाहायला मिळतो. आता ईशाचा रुमर्ड बॉयफ्रेंड समर्थ जुरेलही एन्ट्री करणार आहे.ज्यामुळे अनेक नवे ट्विस्ट येतील. ईशा आणि समर्थ डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ताज्या प्रोमोमध्ये समर्थ देखील ईशाबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसला. त्यामुळे बिग बॉसच्या घरात प्रेम त्रिकोण पाहायला मिळणार आहे.
Promo ⚡ #BiggBoss17#AbhishekKumar#AnkitaLokhande#VickyJain#MannaraChoprapic.twitter.com/XGLZ7TFMQs
— 「𝐋𝐢𝐭𝐭𝐬𝐬𝐒」 (@enocint_boy) October 26, 2023
दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक मनस्वी ममगाईबद्दल बोलायचे झाले तर तिने मिस इंडियाचा किताब जिंकलेला आहे. मनस्वीने अजय देवगणसोबत 'अॅक्शन जॅक्सन' या चित्रपटातून डेब्यू केला आहे. त्याने काजोलसोबत 'द ट्रायल' या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. शिवाय मनस्वीने 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.