'सुख म्हणजे नक्की काय असतं' घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 12:24 IST2023-10-15T12:24:16+5:302023-10-15T12:24:43+5:30
Sukh mhanje nakki kay asta: 'या' कारणामुळे मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

'सुख म्हणजे नक्की काय असतं' घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने दिले संकेत
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. उत्तम कथानक आणि कलाकारांचा साजेसा अभिनय यामुळे या मालिकेने अनेक भागांचे टप्पे गाठले. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेतील एका अभिनेत्यानेच सोशल मीडियावर तशी पोस्ट शेअर करत हिंट सुद्धा दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मात्र, तरीदेखील या मालिकेचा टीआरपी काही वाढताना दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षक आता या मालिकेला कंटाळले असून त्यांनी मालिकेकडे पाठ फिरवली आहे.
या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'शेवटचे काही दिवस' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता खरोखरच ही मालिका संपणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या मालिकेच्या जागी लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपल्यानंतर त्याच्या जागी लक्ष्मीच्या पावलांनी ही नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ईसा केसकर आणि अक्षय कोठारी मुख्य भूमिका साकारणार आहेत. सोबतच किशोरी अंबियेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.