वर्षा अन् सुलक्षणाताईंनी ऑफ कॅमेरा उडवली रमाच्या आईची खिल्ली; अशी झाली अभिनेत्रीची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:52 IST2023-06-15T18:50:23+5:302023-06-15T18:52:12+5:30
Marathi actress: या व्हिडीओमध्ये वर्षा, सुलक्षणाताई आणि रमाची आई या तिघी मेकअप रुममध्ये बसल्याचं दिसून येत आहे.

वर्षा अन् सुलक्षणाताईंनी ऑफ कॅमेरा उडवली रमाच्या आईची खिल्ली; अशी झाली अभिनेत्रीची अवस्था
छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी सेटवरचेही काही किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सुलक्षणाताई म्हणजेच अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वर्षा, सुलक्षणाताई आणि रमाची आई या तिघी मेकअप रुममध्ये बसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये या तिघी एकमेकींची मस्करी करताना दिसत आहेत. 'तुम्ही हसा ना, हसल्यावर तुम्ही छान दिसता', असं सुलक्षणाताई रमाच्या आईला म्हणतात. त्यावर त्या हसतात सुद्धा. त्यानंतर 'आता अजून जोरात हसा', असं पुन्हा सुलक्षणाताई सांगतात. त्यावर रमाची आई पुन्हा हसून दाखवतात. त्यांची ही गंमत वर्षा मागे उभं राहून पाहत असते. रमाची आई जोरजोरात हसत असताना सुलक्षणाताई म्हणतात, 'की मी हा जोक केला होता'. त्यांचं हे बोलणं ऐकून वर्षा तर हसू येतं. मात्र, रमाच्या आईचा चेहरा खाड्कन पडतो. त्यांची ही मजेशीर रिल नेटकरीदेखील एन्जॉय करत आहेत.