'या' कारणामुळे परीने बंद केला यशसोबतचा संवाद; नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:47 IST2022-03-17T18:46:27+5:302022-03-17T18:47:35+5:30

Mazi tuzi reshimgath: या प्रोमोमध्ये परी रुसून बसली असून यश तिला समजवायाच प्रयत्न करत आहे.

tv serial mazi tuzi reshimgath pari and yash Silence | 'या' कारणामुळे परीने बंद केला यशसोबतचा संवाद; नेमकं काय आहे कारण?

'या' कारणामुळे परीने बंद केला यशसोबतचा संवाद; नेमकं काय आहे कारण?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. सध्या या मालिकेत लव्ह ट्रॅक सुरु आहे. नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता या दोघांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर यश आणि नेहाला लग्न करण्यासाठी त्यांना परीची समजूत काढणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे यश परीचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करत आहे. मात्र, या सगळ्या गोंधळात परी यशवर चिडते आणि त्याच्याशी बोलणं बंद करते. त्यामुळे सध्या यश परीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये परी रुसून बसली असून यश तिला समजवायाच प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे यावेळी तो फिल्मी स्टाइलमध्ये गाणं म्हणून तिची समजूत काढत आहे. 

'नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय', हे गाजलेलं लोकप्रिय गाणं यश खास परीसाठी म्हणत आहे. मात्र, परी काही केल्या त्याचं ऐकायला तयार नाही. त्यामुळे आता नेहाची लाडकी लेक यशवर नेमकी कशामुळे चिडलीये हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: tv serial mazi tuzi reshimgath pari and yash Silence