माझी तुझी रेशीमगाठ: घरातील चोरीच्या मागे होता सत्यजीतचा हात?; नेहा देणार काकाला शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:04 IST2022-06-26T13:03:44+5:302022-06-26T13:04:11+5:30

Mazi tuzi reshimgath: काही दिवसांपूर्वीच आजोबांनी घराची संपूर्ण जबाबदारी नेहाच्या खांद्यावर सोपावली. यात अगदी तिजोरीच्या चाव्याही तिच्या हातात दिल्या. मात्र, या चाव्या मिळताच घरात मोठी चोरी होती.

tv serial Mazi tuzi reshimgath Neha will punish satyajit kaka | माझी तुझी रेशीमगाठ: घरातील चोरीच्या मागे होता सत्यजीतचा हात?; नेहा देणार काकाला शिक्षा

माझी तुझी रेशीमगाठ: घरातील चोरीच्या मागे होता सत्यजीतचा हात?; नेहा देणार काकाला शिक्षा

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेने लोकप्रियतेची चांगलीच उंची गाठली आहे. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. सध्या या मालिकेत यश आणि नेहाचं लग्न झाल्यामुळे चौधरींच्या घरी आणि ऑफिसमध्ये दररोज काही ना काही घटना घडताना दिसत आहेत. यामध्येच मध्यंतरी नेहाकडे तिजोरीच्या चाव्या दिल्यानंतर घरात चोरी झाल्याचं समोर आलं. मात्र, ही चोरी कोणत्या बाहेरच्या व्यक्तीमुळे न होता सत्यजीतमुळे झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता नेहा त्याला शिक्षा देणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  यामध्ये घरात झालेली चोरी सत्यजीतमुळे झाल्याचं सिम्मी, आजोबांसमोर कबुल करते. त्यामुळे सत्यजीतला शिक्षा देण्याचा अधिकार आजोबा नेहाला देतात. त्यामुळे नायलाजास्तोवर नेहाला आजोबांचं ऐकावं लागतं. आणि, ती सत्यजीतला शिक्षा देते.

काही दिवसांपूर्वीच आजोबांनी घराची संपूर्ण जबाबदारी नेहाच्या खांद्यावर सोपावली. यात अगदी तिजोरीच्या चाव्याही तिच्या हातात दिल्या. मात्र, या चाव्या मिळताच घरात मोठी चोरी होती. घरातून एक हिऱ्यांचा सेट गायब होतो. त्यामुळे सिम्मी, नेहाला प्रचंड सुनावते. इतकंच नाही तर आजोबाही तिला शिक्षा देतात. परंतु, या चोरीमागे सत्यजीत असल्याचं समोर येतं.

दरम्यान, घरातील हिऱ्यांचा हार सत्यजीतकडे असल्याचं सिम्मी स्वत: आजोबांना सांगते. त्यामुळे आता आजोबांच्या सांगण्यावरुन नेहा सत्यजीतला कोणती शिक्षा देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नाही तर सत्यजीतचं नाव सांगत नेहाला अडकवण्याचा सिम्मीचा हा नवा डाव तर नाही ना हेदेखील येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.
 

Web Title: tv serial Mazi tuzi reshimgath Neha will punish satyajit kaka