माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:42 IST2022-01-27T13:42:21+5:302022-01-27T13:42:53+5:30

Mazi tuzi reshimgath: दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली.

tv serial mazi tuzi reshimgath fame pari aka Myra took a short break | माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य

माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थनासह संकर्षण कऱ्हाडे, बालकलाकार मायरा वायकुळ यांनीही मालिकेची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली. त्यामुळेच परीची भूमिका साकारणारी मायरा आज प्रचंड लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते. परंतु, आता या मालिकेतून परीने ब्रेक घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट मराठी सिरिअल टीआपी पेज यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये काही काळासाठी परीने म्हणजेच मायराने मालिकेतून ब्रेक घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ: सेटवर मायराचं शुटींग टाइमटेबल कसं असतं माहितीये का?

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकताच परीने तिचा ५ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी तिने मालिकेतून लहानसा ब्रेक घेतला आहे. परंतु, हा ब्रेक संपल्यानंतर ती पुन्हा मालिकेत झळकणार आहे.

दरम्यान, परीने काही काळासाठी जरी मालिकेतून ब्रेक घेतला असला तरीदेखील तिने काही भागांचं चित्रीकरण आधीच पूर्ण करुन ठेवलंय. त्यामुळे नेहमीप्रमाणे परी रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: tv serial mazi tuzi reshimgath fame pari aka Myra took a short break