Bigg Boss Marathi 5: टीव्ही अभिनेत्रींचा बिग बॉसमध्ये सहभाग, एकीने लग्नानंतर पाचच महिन्यात केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 21:58 IST2024-07-28T21:57:26+5:302024-07-28T21:58:15+5:30
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात दोन अभिनेत्रींची एन्ट्री

Bigg Boss Marathi 5: टीव्ही अभिनेत्रींचा बिग बॉसमध्ये सहभाग, एकीने लग्नानंतर पाचच महिन्यात केला प्रवेश
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्या चार स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आहे. वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, निखिल दामले आणि पंढरीनाथ कांबळे घरात पोहोचले आहेत. तर आता आपलं नाणं खणखणीत वाजवायला पुढच्या स्पर्धक आल्या आहेत दोन अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar). या दोन्ही अभिनेत्रींनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि 'भाग्य तू दिले मला' फेम जान्हवी किल्लेकर यांनी जबरदस्त डान्सप परफॉर्मन्स सादर करत बिग बॉसच्या स्टेजवर एन्ट्री घेतली. जान्हवी किल्लेकरने रितेश तिचा क्रश असल्याचंही सांगितलं. यामुळे थोडं हलकं फुलकं वातावरण निर्माण झालं. तर दुसरीकडे योगिता चव्हाणच्या लग्नाला पाचच महिने झाले असताना तिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. यामुळे हा सीझन इंटरेस्टिंग असणार आहे.
यंदा बिग बॉस मध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतलं तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही. दरम्यान योगिता चव्हाणने १० हजारांची बिग बॉस करन्सी घेतली आहे. तर जान्हवीने