ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आलीय ही टीव्ही अॅक्ट्रेस, घटविले तब्बल १३ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:33 IST2019-10-16T18:33:06+5:302019-10-16T18:33:50+5:30
या अभिनेत्रीने तब्बल १३ किलो वजन घटविले आहे

ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आलीय ही टीव्ही अॅक्ट्रेस, घटविले तब्बल १३ किलो वजन
बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री वा टेलिव्हिजन इंडस्ट्री... कलाकार फिट राहण्यासाठी तर कधी भूमिकेसाठी वजन घटवतात तर कधी वाढवताना दिसतात. तशीच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजी ही सध्या चर्चेत आली आहे. या मागचं कारण आहे तिचे ट्रान्सफॉर्मेशन.तिच्यातील बदल पाहून तिचे चाहते चकीत झाले आहेत.
वाहबिजने तब्बल १३ किलो वजन घटविले आहे. सोशल मीडियावर तिचा फॅट टू फिट लूक व्हायरल होत आहे.
तिने तिच्या आगामी वेबसीरिजसाठी वजन घटविले आहे आणि सध्या ती हेल्दी डाएट करते आहे.
वाहबिजने हेल्दी लाईफ स्टाईलबद्दल सांगितलं की, मी नेहमीच फिट लाईफ स्टाईलमध्ये राहते. त्यामुळे वर्कआऊट करणं माझ्या दैनंदिन जीवनाचा मुख्य भाग आहे.
आता मी टप्प्या टप्प्याने खाते. योगा, नियमित वॉक हे माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे.
यासोबतच वाहबिजने आगामी प्रोजेक्टबद्दल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे.
तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर वाहबिज विवियन डिसेनासोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. या दोघांनी २०१६ साली विभक्त होत असल्याचं सांगितलं होतं.