'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानचा नवा प्रोजेक्ट, शूटिंगला केली सुरुवात, सेटवरील फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:58 IST2025-04-04T13:57:39+5:302025-04-04T13:58:27+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली हे समजलं नसलं तरी तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानचा नवा प्रोजेक्ट, शूटिंगला केली सुरुवात, सेटवरील फोटो समोर
मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली. या मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेनंतर प्रेक्षकांनी तिला 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताच्या भूमिकेतही पसंत केलं होतं. मात्र अचानक तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली हे समजलं नसलं तरी तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या प्रोजेक्टच्या शूटिंगलाही तेजश्रीने सुरुवात केली आहे. तेजश्रीच्या या प्रोजेक्टचं नाव काय आणि ती यात नेमकी कोणती भूमिका साकारणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, शूटिंग सेटवरचे काही फोटो तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेता शुभंकर एकबोटेने सेटवरील एका कॅमेराचा फोटो शेअर करत स्टोरी टाकली आहे. यात त्याने तेजश्रीलाही टॅग केलं आहे. तर तेजश्रीनेही सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा नवा लूक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर मालिकेत स्वरदा ठिगळे हिने मुक्ता म्हणून एन्ट्री घेतली. पण, तेजश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेचा टीआरपी घसरला. त्यामुळे मालिकेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.