शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:55 IST2025-03-09T16:54:37+5:302025-03-09T16:55:26+5:30
टीव्ही अभिनेत्रीसोबत दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येतेय. यात ती बचावली असली तरीपण तिला दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे

शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना
टीव्ही अभिनेत्री समृद्धी शुक्लासोबत (samridhii shukla) एक घटना घडली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेचं शूटिंग करताना कूकींग सीनवेळेस झालेल्या घटनेत समृद्धीचा हात भाजला. ही घटना ७ मार्चला मालिकेच्या सेटवर घडली. यामुळे समृद्धीच्या चाहत्यांना तिची चिंता वाटली. पण विशेष म्हणजे हात भाजलेला असूनही समृद्धीने शूटिंग करणं सोडलं नाही. यामुळे तिचं चांगलंच कौतुक होतंय. काय घडलं नेमकं?
कचौरी बनवताना हात जळाला अन्...
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या ट्रॅकनुसार समृद्धी कचोरी बनवत होती. मालिकेत सध्या समृद्धी-अरमान यांच्या फर्स्ट वेडींग अॅनिव्हर्सरीचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे अभिराच्या भूमिकेत समृद्धी कचोरी बनवत होती. समृद्धीला उकळत्या तेलात कचोरीला फ्राय करायचं असतं. याच सीनच्या शूटिंगदरम्यान तेल तिच्या अंगावर आल्याने तिचा हात थोडासा जळाला.
याविषयी इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत समृद्धी म्हणाली की, "थोडंसं गरम तेल माझ्या अंगावर आल्याने माझा हात जळाला. मला एखादा पदार्थ डीप फ्राय करायची कोणतीच आयडिया नव्हती. मला वाटतं की चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली आहे. माझ्या आई-बाबांनी मला याविषयी कधी काही सांगितलं नाही त्यामुळेच ही घटना घडली. परंतु आता सर्व सुरक्षित आहे." हात भाजूनही शूटिंग सुरु ठेवल्याने समृद्धीची प्रशंसा होतेय.