ना झगमगाट, ना बडेजाव...प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, साधेपणाची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:49 IST2023-10-06T11:49:09+5:302023-10-06T11:49:45+5:30
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या साध्या लग्नाची चर्चा, व्हिडिओ व्हायरल

ना झगमगाट, ना बडेजाव...प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, साधेपणाची होतीये चर्चा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रिसन बैरेटो सध्या चर्चेत आली आहे. क्रिसनच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 'कैसी ये यारिया' मालिकेतून घराघरात पोहोचलेली क्रिसन लग्नबंधनात अडकली आहे. क्रिसनने बॉयफ्रेंड नाथन करमचंदानीबरोबर कोर्ट मॅरेज केलं आहे. क्रिसन आणि नाथनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्रिसन आणि नाथन करमचंदानी काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एप्रिल महिन्यात साखरपुडा करत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. क्रिसन आणि नाथनने अगदी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. एकीकडे सेलिब्रिटींचे शाही विवाहसोहळे चर्चेत असताना क्रिसनच्या साध्या कोर्टमॅरेजने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी क्रिसन आणि नाथन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिसनने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. लग्नानंतर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला त्यांनी छोटीशी पार्टीही दिली. क्रिसनने 'हिरोज', 'द फाइटबॅक फाइल्स', 'ये है आशिकी', 'इश्कबाज' या मालिकांमध्येही काम केलं आहे. तिने अनेक रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.