हृता दुर्गुळेने सोडली 'मन उडू उडू झालं' मालिका? 'या' कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:23 IST2022-05-02T12:15:31+5:302022-05-02T13:23:16+5:30

Hruta durgule: सूत्रांच्या माहितीनुसार, हृताने 'मन उडू उडू झालं' ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

tv actress hruta durgule quits tv serial man udu udu zhala | हृता दुर्गुळेने सोडली 'मन उडू उडू झालं' मालिका? 'या' कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

हृता दुर्गुळेने सोडली 'मन उडू उडू झालं' मालिका? 'या' कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. उत्तम कथानक आणि कलाकारांचं अभिनयकौशल्य यांच्यामुळे ही मालिका लोकप्रियतेत प्रथम स्थानावर आहे. यात खासकरुन दिपू आणि इंद्रा यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली असून त्यांच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव होत असतो. या मालिकेत दीपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (hruta durgule) साकारली आहे.  विशेष म्हणजे प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या हृताने 'मन उडू उडू झालं' ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, हृताने 'मन उडू उडू झालं' ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या निर्मात्यांसह काही कारणावरुन वाद झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याविषयी अद्याप हृताने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

खरंच हृताने सोडली का मालिका?

काही दिवसांपूर्वी हृता आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये भांडण झालं होतं. सेटवर अस्वच्छता असल्यामुळे हृता व निर्मात्यांमध्ये भांडण झाल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या दोघांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे हृताने तडकाफडकी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मालिकेत काम करण्यापूर्वी हृताने केलेल्या करारानुसार, तिला एक महिन्याचा नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येईल.

दरम्यान, हृताने ही मालिका सोडल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काहींच्या मते, हृताने ही मालिका निर्मात्यांसोबत वाद झाल्यामुळे सोडली आहे. तर, काहींच्या मते, तिने तिच्या लग्नासाठी ब्रेक घेतला आहे. इतंकच नाही तर ती लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्यामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र, या कोणत्याही वृत्ताला हृताकडून दुजोरा किंवा तिचं स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही. हृता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

Web Title: tv actress hruta durgule quits tv serial man udu udu zhala