'कापड कमी पडलं वाटतं', ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदा रामतीर्थकरने ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:37 IST2023-07-06T11:36:19+5:302023-07-06T11:37:39+5:30

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकार घरोघरी पोहोचली.

tv actress dnyanada ramtirthakar trolled for her outfit gives staright reply to troller | 'कापड कमी पडलं वाटतं', ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदा रामतीर्थकरने ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

'कापड कमी पडलं वाटतं', ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदा रामतीर्थकरने ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

मनोरंजनविश्वातील कलाकारांना ट्रोलिंग काही नवीन नाही. कपड्यांवरुन, दिसण्यावरुन तर त्यांना कायमच ट्रोल केलं जातं. सोशल मीडियामुळे तर नावं ठेवणं जास्तच सोपं झालंय. अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरुन, अगदी वजनावरुनही नावं ठेवली जातात. अनेकदा कलाकार त्याकडे दुर्लक्ष करतात तर काहीवेळा सडेतोड उत्तरंही देतात. नुकतंच ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकारलाही (Dyananda Ramtirthakar) अनुभव आलाय.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकार घरोघरी पोहोचली. पावसात भिजतानाचे काही फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर अपलोड केले. यात तिचा अगदीच कॅज्युअल लुक आहे. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स तिने घातली आहे. तर पायात स्लीपर्स आहेत. पावसाळी पातावरणाचा ती आनंद घेत आहे. 

पण तिच्या या फोटोवर एका युझरने भलतीच कमेंट केली आहे. 'कापड कमी पडलं वाटतं' अशी कमेंट त्याने केली आहे. यावर साहजिकच आहे कोणाचाही संताप होणार. तिने या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने लिहिले,'नाही. तुमच्या विचारांची पोच कमी पडली.'

[object Object], ट्रोलरच्या कमेंटवर,

ज्ञानदाने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. 'सख्या रे','दिल दोस्ती दुनियादारी' तर आता 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय 'धुरळा' सिनेमातही तिची भूमिका होती.

Web Title: tv actress dnyanada ramtirthakar trolled for her outfit gives staright reply to troller