लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट, आता ९ वर्षांनी छोट्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहतेय टीव्ही अभिनेत्री, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:08 IST2025-11-05T13:06:01+5:302025-11-05T13:08:20+5:30
५३ वर्षीय डेलनाज तिचा बॉयफ्रेंड पर्सी करकरियासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. डेलनाज तिचा पार्टनर पर्सीपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे.

लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट, आता ९ वर्षांनी छोट्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहतेय टीव्ही अभिनेत्री, म्हणाली...
सिनेइंडस्ट्रीमधील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सध्या टीव्ही अभिनेत्री डेलनाज ईरानी तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. डेलनाजने राजीव पॉलसोबत लग्न करत संसार थाटला होता. मात्र लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. आता ५३ वर्षीय डेलनाज तिचा बॉयफ्रेंड पर्सी करकरियासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. डेलनाज तिचा पार्टनर पर्सीपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे.
डेलनाजने नुकतंच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉयफ्रेंडबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "पर्सीचा देखील घटस्फोट झालेला आहे. सुरुवातीला माझ्याशी लग्न करण्यासाठी तो उत्सुक होता. पण, तो माझ्यापेक्षा ९ वर्षांनी छोटा आहे. त्यामुळे आम्ही याबाबत साशंक होतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण, जेव्हा तुम्ही भावनिकरित्या विखुरलेले असता आणि अशा वेळी एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. तेव्हा त्यांना समजून घ्यायला आणि विश्वास ठेवायला वेळ लागतो".
"स्वत:ला सावरून दुसऱ्या व्यक्तीवर पुन्हा प्रेम करणं यासाठी हिंमत लागते. मला आमच्या नात्याला कोणतंही नाव द्यायचं नाही. कारण आमचं नातं हे पवित्र आहे. त्याच्यासाठी मी एक अभिनेत्री नाही तर केवळ डेलनाज आहे. माझ्यासाठी तो एक फरिश्ता आहे. माझी काळजी घेणारा, माझं हसू परत आणणारा, मला आनंदी ठेवणारा. त्याच्यामुळे मी प्रेमावर परत विश्वास ठेवू शकले. आम्ही जीवनसाथी आहोत. पण, मला या नात्याला नाव द्यायचं नाही. मी मनातून त्याला माझा पती मानते", असंही डेलनाज म्हणाली.