भारती सिंगचं आलिशान घरं कधी पाहिलंय का? बॉलिवूड सेलेब्सप्रमाणेच सजवलाय घरचा प्रत्येक कोपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:47 IST2022-02-07T13:47:19+5:302022-02-07T13:47:53+5:30
Bharti Singh: या व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा दाखवला आहे. तसंच तिने अत्यंत सुंदररित्या घर सजवलं असून तिच्या घरातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

भारती सिंगचं आलिशान घरं कधी पाहिलंय का? बॉलिवूड सेलेब्सप्रमाणेच सजवलाय घरचा प्रत्येक कोपरा
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे भारती सिंग (Bharti Singh). गेल्या कित्येक वर्षांपासून भारती प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर म्हणून ती ओळखली जाते. विशेष म्हणजे भारती लवकरच आई होणार आहे. मात्र, या दिवसांमध्येही ती प्रचंड मेहनत घेत असून हुनरबाज या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसंच युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांच्याही सातत्याने संपर्कात राहत आहे. यामध्येच यावेळी तिने तिच्या घराची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
कलाविश्वाप्रमाणेच भारती सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील काही घटना, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'स्वागत है आपका' या नावाने तिने होम टूरचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा दाखवला आहे. तसंच तिने अत्यंत सुंदररित्या घर सजवलं असून तिच्या घरातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 122 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.