'मुंबईची मुलगी...' अनिता हसनंदानीचंही 'गुलाबी साडी' वर रील; म्हणाली, 'फक्त या गाण्यासाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 13:32 IST2024-04-07T13:32:01+5:302024-04-07T13:32:19+5:30

'गुलाबी साडी' गाण्यावर अनिताने एक झक्कास रील केलंय.

Tv Actress Anita Hassanandani did reel on viral song Gulabi Sadi says mumbai girl wore pink sari for this song | 'मुंबईची मुलगी...' अनिता हसनंदानीचंही 'गुलाबी साडी' वर रील; म्हणाली, 'फक्त या गाण्यासाठी...'

'मुंबईची मुलगी...' अनिता हसनंदानीचंही 'गुलाबी साडी' वर रील; म्हणाली, 'फक्त या गाण्यासाठी...'

सोशल मीडियावर एकामागोमाग नवनवीन रील्स व्हायरल होत असतात. कित्येक गाणी तर त्यांच्या रील्सवरुनच व्हायरल होत आहेत. रील्समुळे असं काही गाणं आहे  हे लोकांना समजतंय. तसंच कोणत्याही भाषेतील गाणं असो त्यावरचं  रील करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. हिंदी टीव्हीविश्वातील 'नागिन' म्हणजेच अनिता हसनंदानीलाही (Anita Hassanandani) सध्या व्हायरल होत असलेल्या मराठी गाण्यावर रील करण्याचा मोह आवरलेला नाही. 'गुलाबी साडी' गाण्यावर तिने एक झक्कास रील केलंय.

'गुलाबी साडी आणि गाली लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ' सध्या मोबाईल हातात घेतला की  हेच गाणं ऐकू येतंय. छान गुलाबी रंगाची साडी नेसून मुली, बायका हे रील करताना दिसत आहेत. अगदी हिंदीतील अभिनेत्रीही गाण्याच्या फॅन झाल्या आहेत. 'ये है मोहोब्बते','नागिन' फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीनेही गाण्यावर खास रील केलंय. गुलाबी रंगाची साडी, त्यावर आकर्षक गुलाबी ब्लाऊज नेसून तिने या गाण्यावर दाखवलेल्या अदांवर चाहते घायाळ झालेत. बॅकग्राऊंडला हे गाणं आणि तिची गुलाबी साडी यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. चाहत्यांनी तिच्या रीलवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'मुंबईच्या मुलीने फक्त या गाण्यासाठी ही गुलाबी साडी नेसली आहे.'

अनिताने २०२० साली मुलाला जन्म दिला. त्याचं नाव आरव असं ठेवण्यात आलं. आरवच्या जन्मानंतर अनिता त्याच्या पालनपोषणात व्यस्त झाली. तिचं वजनही मध्यंतरी खूप वाढलं होतं. पण वर्कआऊट आणि मेहनतीच्या जोरावर तिने पुन्हा वजन कमी केलंय. ती आधीसारखीच एकदम फिट आणि सुंदर दिसत आहे. अनिताच्या या रीलमधूनही ते लक्षात येतं. अनिताने 'नागिन 6' मध्ये भूमिका साकारली होती. आता तिला पुन्हा स्क्रीनवर बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Web Title: Tv Actress Anita Hassanandani did reel on viral song Gulabi Sadi says mumbai girl wore pink sari for this song