‘लग्नाची बेडी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणारा तो अभिनेता कोण,जाणून घ्याबाबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 14:11 IST2022-01-05T13:15:32+5:302022-01-05T14:11:01+5:30
‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) मालिकेत तो आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘लग्नाची बेडी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणारा तो अभिनेता कोण,जाणून घ्याबाबत
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता भेटीला येतेय नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लग्नाची बेडी' (Lagnachi Bedi) असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमोही वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या मालिकेतून अभिनेता संकेत पाठक ( Sanket Pathak )दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय. ‘लग्नाची बेडी’ मालिकेत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा हा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी.
संकेतसाठी ही मालिका नवं आव्हान असणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, ‘राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते. हे पात्र साकारताना एक अभिनेता म्हणून नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह सोबत जुनं नातं आहे. याधी दुहेरी आणि छत्रीवाली या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे हे नवं पात्र आणि नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.