हा नक्की निलेश साबळेच आहे ना? पाहा, 21 व्या वर्षी कसा दिसायचा 'हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:25 PM2024-02-21T15:25:42+5:302024-02-21T15:26:21+5:30

Nilesh sable: आपले आवडते कलाकार त्यांच्या कॉलेज जीवनात कसे दिसत असतील, त्यांची तेव्हाची फॅशन स्टाइल कशी असेल असे प्रश्न कायमच चाहत्यांना पडत असतात. त्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी निलेश साबळे कसा दिसायचा ते पाहा.

tv actor nilesh sable how the looks like at age 21 see photo | हा नक्की निलेश साबळेच आहे ना? पाहा, 21 व्या वर्षी कसा दिसायचा 'हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का

हा नक्की निलेश साबळेच आहे ना? पाहा, 21 व्या वर्षी कसा दिसायचा 'हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला रिअॅलिटी शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya). आजवर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो. या कलाकारांविषयी आणि त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. त्यामुळेच ही कलाकार मंडळी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये चला हवा येऊ द्याचा सूत्रसंचालक अर्थात अभिनेता डॉ. निलेश साबळे (nilesh sable) याची चर्चा रंगली आहे.

उत्तम अभिनेता, सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला निलेश साबळे याने काही काळापूर्वीच सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. मात्र, कमी कालावधीतही त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या चाहत्यांसोबत तो कायम त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील घटना, किस्से आणि घडामोडी शेअर करत असतो. यावेळी पहिल्यांदाच त्याने त्याचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या निलेश साबळेने त्याचा जुना फोटो शेअर केला आहे. निलेश २१ वर्षांचा असतानाचा हा फोटो आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर निलेशमध्ये जराही बदल न झाल्याचं दिसून येतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

Web Title: tv actor nilesh sable how the looks like at age 21 see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.