लेक असावा तर असा! मराठी अभिनेत्याने वडिलांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिली नवी कोरी कार
By कोमल खांबे | Updated: October 29, 2025 15:18 IST2025-10-29T15:18:10+5:302025-10-29T15:18:46+5:30
मंदारने मारुती कंपनीची गाडी खरेदी केली आहे. वडिलांना वाढदिवशी त्याने मारुती सुझुकी अल्टो ही लाल रंगाची गाडी गिफ्ट केली आहे.

लेक असावा तर असा! मराठी अभिनेत्याने वडिलांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिली नवी कोरी कार
महागड्या कार घेणं ही सेलिब्रिटींसाठी तशी मोठी गोष्ट राहिलेली नाही. पण, एका मराठी अभिनेत्याने वडिलांच्या वाढदिवशी चक्क त्यांना नवी कोरी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. अभिनेत्याने याचे फोटो शेअर केले आहेत. हा अभिनेता म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मंदार जाधव. मंदारने वडिलांच्या वाढदिवशी त्यांना खास सरप्राइज दिलं आहे.
मंदारने मारुती कंपनीची गाडी खरेदी केली आहे. वडिलांना वाढदिवशी त्याने मारुती सुझुकी अल्टो ही लाल रंगाची गाडी गिफ्ट केली आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने नव्या कोऱ्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मंदारचं संपूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे. "मेरे डॅड की मारुती... हॅपी बर्थडे पापा.. खूप प्रेम", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी मंदारचं अभिनंदन केलं आहे. या गाडीची किंमत ३ ते ५ लाख इतकी आहे.
दरम्यान, मंदारला 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मंदारप्रमाणेच त्याचा भाऊ मेघनदेखील अभिनेता आहे. मेघन सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.