विवाहित असूनही मुंबईत लिव्ह इनमध्ये राहत होता अभिनेता, दुसऱ्या शहरात होती पत्नी आणि मुलं, अभिनेत्रीला नव्हता थांगपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:44 IST2025-11-06T11:42:47+5:302025-11-06T11:44:56+5:30
एका टीव्ही अभिनेत्याने विवाहित असल्याचं लपवून अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा खुलासा डिटेक्टिव्ह तान्याने केला आहे.

विवाहित असूनही मुंबईत लिव्ह इनमध्ये राहत होता अभिनेता, दुसऱ्या शहरात होती पत्नी आणि मुलं, अभिनेत्रीला नव्हता थांगपत्ता
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि अफेअर्सबद्दल कायमच चर्चा होत असते. डिटेक्टिव्ह तान्या पुरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतून बॉलिवूडची आणि सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांची पोलखोल केली आहे. नाव न घेता बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअर्स आणि एक्स्ट्रा मरेटियअलची भयानक स्टोरी तिने सांगितली आहे. एका टीव्ही अभिनेत्याने विवाहित असल्याचं लपवून अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा खुलासा तान्याने केला आहे.
डिटेक्टिव्ह तान्या पुरीने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. "एक हिंदी टीव्ही अभिनेत्री होती. तिचं पॉप्युलर टीव्ही अभिनेत्यासोबत लग्नही झालं होतं. पण, अभिनेत्रीला संशय होता की तिच्या पतीचं म्हणजेच त्या अभिनेत्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा कळलं की तो तर आधीपासूनच विवाहित होता. त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगाही होता. त्याची पत्नी आणि मुलगा दुसऱ्या शहरात राहत होते. आम्हालाही वाटलं नव्हतं की असं काहीतरी समोर येईल", असं तान्याने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "९०च्या दशकातील तो फेमस अभिनेता होता. त्याने एका लोकप्रिय मालिकेत कामही केलं होतं. तो दुसऱ्या शहरात त्याच्या कुटुंबाला भेटायला जायचा. त्याची जी आताची पत्नी होती(अभिनेत्री) तिच्याकडून पैसे घेऊन तो कुटुंबीयांना द्यायचा. अभिनेत्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नव्हता. आणि त्याने त्याचं दुसरं लग्न रजिस्टर केलेलं नव्हतं. त्यामुळे कायद्याने अभिनेत्री त्याची पत्नी नव्हतीच. त्यांनी मंदिरात जाऊन एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं. लग्नाची गरज नाही, असं ते म्हणाले होते. ज्याची बातमीही वृत्तपत्रात छापूनही आलं होतं".
अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीला याबाबत सगळं काही माहीत होतं, असा धक्कादायक खुलासाही तान्याने केला. "त्याची पहिली पत्नी आणि मुलालाही याबद्दल सगळं काही माहीत होतं. पण ते त्याला काहीच बोलायचे नाहीत. त्याची पहिली पत्नी एका छोट्या शहरातून होती. तिथे लोकांना हे माहीतही नव्हतं की हा एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने मुंबईत येऊन त्याचं नावही बदललं होतं", असं तान्याने सांगितलं.