प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत चढली बोहल्यावर; समुद्रकिनारी थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:23 IST2025-10-08T12:20:43+5:302025-10-08T12:23:44+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न झालं असून तिच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे

प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत चढली बोहल्यावर; समुद्रकिनारी थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
लोकप्रिय टीव्ही मालिका 'दिया और बाती हम' (Diya Aur Baati Hum) फेम अभिनेता एलन कपूरने (Alan Kapoor) त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रविरा भारद्वाज (Raviraa Bhardwaj) हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी या दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. एलन कपूरने स्वतः सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या लग्नाचे शानदार फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
विवाह सोहळ्याचे खास क्षण
एलन कपूरने ७ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर लग्नाचे दोन खास फोटो पोस्ट केले. पहिल्या फोटोत दोघे एकत्र पोज देताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत समुद्राच्या किनाऱ्यावर काही विधी करताना दिसत आहेत. यावेळी एलन कपूरने खास शेरवानी परिधान केली होती, तर एलनची बायको रविरा भारद्वाज लाल रंगाच्या आकर्षक नववधूच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. एलनने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "काही गोष्टी ७.१०.२०२५ साठीच बनलेल्या असतात."
कशी झाली भेट?
मीडिया रिपोर्टनुसार, एलन आणि रविरा यांची भेट काही वर्षांपूर्वी त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून झाली होती. तेव्हापासून त्यांचं नातं अधिक घट्ट झालं आणि आता ते विवाहबंधनात अडकले आहेत. एलन कपूरने 'दिया और बाती हम' मालिकेत आयपीएस राहुल कपूर ही भूमिका साकारली होती. तो संध्या राठीचा (दीपिका सिंग) मित्र आणि रोमाचा एक्स-बॉयफ्रेंड म्हणून दिसला होता. तर अभिनेत्री रविरा भारद्वाज ही 'ऐसा क्यू', 'लिसन 2 दिल' आणि 'ब्रेकअप की पार्टी' यांसारख्या शोमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.