राणादाची नवी इनिंग, हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त करतो हा साईड बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:31 IST2022-03-01T11:30:46+5:302022-03-01T11:31:02+5:30

Hardik Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक घराघरात पोहोचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत हार्दिकने आता एक नवी इनिंग सुरू केली आहे. 

tuzyat jiv rangala ranada aka hardik joshi starting new business | राणादाची नवी इनिंग, हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त करतो हा साईड बिझनेस

राणादाची नवी इनिंग, हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त करतो हा साईड बिझनेस

तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat jeev Rangala) ही मालिका कधीच संपली. पण राणादा अजूनही आठवणीत आहे. होय, साधा भोळा, रांगडा राणादा प्रेक्षकांना जाम भावला होता. अभिनेता हार्दिक जोशीने (Hardeek Joshi) ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे हार्दिक घराघरात पोहोचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत हार्दिकने आता एक नवी इनिंग सुरू केली आहे. 
हिंदीतील अनेक सेलिब्रिटी अभिनयासोबत स्वत:चा साईड बिझनेस करतात. टीव्ही आणि मराठी कलाकारही यात मागे नाहीत. नुकताच अभिनेता यशोमन आपटे याने स्वत:चा कॅफे सुरू केला होता. तेजस्विनी पंडित व अभिज्ञा भावे यांचा कपड्यांचा ब्रँड आहे. शशांक केतकरने पुण्यात स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. अपूर्वा नेमळेकरचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड आहे. आता या यादीत अभिनेता हार्दिक जोशीचं नाव सुद्धा सामील झालं आहे.

होय, आता   हार्दिक जोशीने स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. कोल्हापुरात त्याने ‘कोल्हापूर बदाम थंडाई’चा व्यवसाय उघडला आहे.
2015 मध्ये आलेल्या ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. हार्दिक जोशीने या आधीदेखील अस्मिता, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची केमिस्ट्री व प्रेमकहाणीसुद्धा त्यांना भावली होती.  हार्दिकला व्यायामाची आवड आहेच सोबतच त्याला ढोल वाजवायला देखील आवडते.

Web Title: tuzyat jiv rangala ranada aka hardik joshi starting new business