New Marathi Serial : लवकरच येतेय आणखी एक नवीकोरी मराठी मालिका, ‘राणादा’चा भाऊ साकारतोय मुख्य भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:27 IST2022-06-16T11:25:56+5:302022-06-16T11:27:08+5:30

New Marathi Serial : या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेमात पडाल, मराठीसोबत साऊथचा तडका...

Tuzhat Jeev Rangala fame raj hanchnale Pratiksha Shiwankar new serial sony marathi | New Marathi Serial : लवकरच येतेय आणखी एक नवीकोरी मराठी मालिका, ‘राणादा’चा भाऊ साकारतोय मुख्य भूमिका 

New Marathi Serial : लवकरच येतेय आणखी एक नवीकोरी मराठी मालिका, ‘राणादा’चा भाऊ साकारतोय मुख्य भूमिका 

नव्या मालिकांची प्रतीक्षा चाहत्यांना नेहमीच असते. सध्या मराठी वहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकांमध्ये नवनवे विषय हाताळले जात आहेत. आता आणखी एक नव्या दमाची प्रेमकहाणी अर्थात एक नवी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सोनी मराठीवर (Sony Marathi) ही नवी कोरी मालिका तुम्ही बघू शकणार आहात. या नव्या मालिकेत ‘तुझ्यात जीव रंगला’मधील (Tuzhat Jeev Rangala) राणादाचा भाऊ अर्थात मालिकेतील वहिनीसाहेबांचा नवरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) याच्याबद्दल.

होय, राज हंचनाळे एका नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो राजने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘नवीन प्रेमकहाणी लवकरच...,’असं त्याने त्याच्या या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

या मालिकेत राजसोबत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) मुख्य भूमिकेत आहे. एक कन्नड भाषिक मुलगी आणि एक मराठी मुलगा यांची प्रेमकहाणी या मालिकेत दिसणार असल्याचं प्रोमो बघता दिसतंय. राजने आपल्या अकाऊंटवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये, तो एका सुंदर मुलीसोबत नदीकिनारी उभा असलेला दिसतो. त्याचवेळी ती त्याला भेटायला येते आणि या दोघांमध्ये मजेशीर पण प्रेमळ संवाद ऐकायला मिळतो.  
 हा प्रोमो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. ती कधीपासून प्रसारित होणार, हेही कळलेलं नाही. लवकरच त्याचाही खुलासा होईल.

या मालिकेत राजसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या प्रतीक्षाने याआधी एका लग्नाची पुढची गोष्ट, कॉलेज डायरी,कॉमेडी बिमेडी अशा प्रोजेक्टसमध्ये काम केलं आहे. 

राज हंचनाळेने ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत राणादा म्हणजेच हार्दिक जोशीच्या भावाची आणि धनश्री काडगावकरच्या पतीची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

Web Title: Tuzhat Jeev Rangala fame raj hanchnale Pratiksha Shiwankar new serial sony marathi