Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या मामाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले- "शीजानसोबत राहून ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 23:35 IST2022-12-28T23:35:17+5:302022-12-28T23:35:48+5:30

तुनिषाचे मामा Pawan Sharma यांनी काही विचित्र महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.

Tunisha Sharma mama Pawan Sharma revealed shocking things says she used to wear hijab | Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या मामाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले- "शीजानसोबत राहून ती..."

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या मामाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले- "शीजानसोबत राहून ती..."

Tunisha Sharma Death Case: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांचा कस लागला आहे. यादरम्यान, तुनिशा काम करत असलेल्या टीव्ही सीरियल 'अली बाबा-दास्तान-ए-काबुल'च्या कलाकारांशी पोलिस चौकशी करत आहेत. तसेच तुनिशाच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान तुनिषाच्या मामाने असा प्रकार पोलिसांना सांगितला, जे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसेल. तुनिषाचे मामा (पवन शर्मा) यांनी पोलिसांना सांगताना काही धक्कादायक खुलासे केले.

तुनिषाच्या मृत्यूबाबत त्यांनी लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला आहे. पवन शर्मा हिजाब परिधान केलेल्या तुनिषाबद्दल बोलले आणि सोशल मीडियावर तुनिषाने हिजाब परिधान केल्याचा एक फोटो देखील आहे. ज्यामध्ये ती शीजानसोबत दिसत आहे आणि कॅमेऱ्याकडे हसताना बघत आहे. तुनिषाच्या वागण्यात खूप बदल झाला होता. ती शीजानच्या सोबत राहून खूपच बदलत चालली होती आणि तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती, असे तिचे मामा पवन शर्मा म्हणाले. सध्या पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.

या दरम्यान, न्यायालयाने शीजनच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. शीजानला ३० डिसेंबर रोजी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा शीजन त्याच्या सहकलाकारांसह तुनिशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. सध्या अभिनेत्रीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात तुनिषाचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तिचे कुटुंबीय शीजानबाबत विविध विधाने करत आहेत. पण तुनिषाची आई मात्र, शीजानला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे.

तुनिशाच्या आईने अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझानमुळेच मुलगी तुनिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तर तुनिशाने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस आधीच तुनिशाची आई मालिकेच्या सेटवर आली होती. त्यांनी शिझान खानसोबत बराच वेळ चर्चा केली. तसंच तुनिशापासून दूर राहा असंही त्यांनी शिजानला ठणकावून सांगितलं.

Web Title: Tunisha Sharma mama Pawan Sharma revealed shocking things says she used to wear hijab